Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
नाट्यमयता/संघर्ष: | कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. |
संवाद: | कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितिजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. |
भाषाशैली: |
कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्परविरोधी भूमिकांतून तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगांतून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळेसौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते. |
(१) (2)
(i)
(ii)
(२) कथेतील ‘नाटयात्मता’ या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे स्पष्ट करा. (2)
उत्तर
(१) (i)
(ii)
(२) कोणतीही कथा त्या लेखकाची अभिजात कला असून त्यामध्ये चांगल्या-वाईटाचा अनुभव हा असतोच कारण अशा अनुभवातूनच नाट्यात्मता निर्माण होते. अशा संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष वा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही तर आनंद आणि सुखातिला अशा घटनांतूनही नाट्यात्मता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो असे असले तरी कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे केलेला शेवट हा वाचकांची मने आकर्षित करत असते. आणि म्हणून कथेमध्ये नाट्यात्मता या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.