Advertisements
Advertisements
प्रश्न
‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर
निरंजन हा एक हुशार आणि जबाबदार मुलगा आहे. त्याच्या या गुणांचे दर्शन पाठात घडतेच; पण त्याच्यातल्या खऱ्या नागरिकाची ओळख होते, ती रेल्वेच्या घटनेतून. पुलावरचे रूळ खराब झाल्यामुळे रेल्वे अपघाताचा भयंकर धोका त्याने ओळखला. खराब रुळांमुळे अपघात झाल्यास शेकडो लोकांचा जीव धोक्यात येईल हे त्याने ओळखले आणि स्वत:चा नागरिकशास्त्राचा पेपर बुडवूनही त्याने स्टेशनमास्तरांना खबर दिली. या कृतीमुळे आपला पेपर बुडेल, गुरुजींनी दिलेल्या सवलती जातील, हे माहीत असूनही, लोकांचा जीव वाचवण्याकरता स्वत:चे नुकसान सोसण्याची तयारी त्याने दाखवली. त्यामुळे, एक मोठा अनर्थ टळला. नागरिकशास्त्र हा विषय आपल्याला जे शिकवतो ते त्याने प्रत्यक्षात आयुष्यात करून दाखवले. त्यामुळे, 'निरंजन एक खरा नागरिक' असल्याचे स्पष्ट होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
निरंजनची दिनचर्या लिहा.
निरंजनची दिनचर्या |
↓ |
_________________________ |
↓ |
_________________________ |
↓ |
_________________________ |
↓ |
_________________________ |
↓ |
_________________________ |
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.
स्वप्नाळू-
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.
संवेदनशील-
तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. चौकट पूर्ण करा. (०२)
मामा गेला तो पुन्हा परतला नाही; मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर रहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, की 'जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.' गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता. नागरिकांची कर्तव्ये कोणती? उत्तम नागरिक कुणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. नऊ वाजून गेले होते. साडेदहाची परीक्षा. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. केवढंतरी लांब चालायचं होतं. भराभर आवरून तो निघाला. |
२.आकलन कृती
कारण लिहा. (०२)
- निरंजन वार लावून जेवायचा, कारण -______
- निरंजन मनातल्या मनात उजळणी करत होता, कारण - ______
३. स्वमत (०३)
हक्काचे घर नसले की इतरत्र राहताना लहानपणीच परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुले शिकतात. तुमचे मत स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१.
१. उताऱ्याच्या आधारे पाच हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (०१)
२. कोष्टक पूर्ण करा. (०१)
रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पंन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देखमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळयांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळया बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळया कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती. निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. |
२. आकलन कृती
१. घटनाक्रम लावा. (०२)
१. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं.
२. निरंजनने आर्जवं केली.
३. पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं.
४. नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती.
३. स्वमत (०३)
कधी कधी छोटी मुलेही समाजोपयोगी असे मोठे काम करतात. तुमचे विचार स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा. (2)
- स्टेशनमास्तरांकडे धाव घेणारा - ______
- गाडी दीर्घकाळ थांबविण्याचा आदेश देणारे - ______
निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. स्वमत (3)
निरंजनने त्याक्षणी घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (2)
- पहाटे चार वाजता शेवटची गाडी इथून जाते.
- निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठले.
- स्टेशन इथून खूप दूर होतं.
- पुलावरचे रूळ चांगल्या स्थितीत होते.
रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती. निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. |
(2) आकृतिबंध पूर्ण करा. (2)
(3) स्वमत. (3)
तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा.