Advertisements
Advertisements
प्रश्न
निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.
टीपा लिहा
उत्तर
- भारतीय संविधानातील कलम ३२४ नुसार एक स्वायत्त यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
- भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात.
- या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते.
- संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते.
- निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणाला दिलेला नाही.
- पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. त्यांनी कठीण व प्रतिकूल परिस्थितीतही निवडणुका घेण्याची जबाबदारी कौशल्याने पार पाडली.
shaalaa.com
निवडणूक आयोगाची कार्य
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?