Advertisements
Advertisements
प्रश्न
1. पत्रलेखन:
पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.
उत्तर
1.
विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक : १७ जुलै, २०२०
प्रति,
माननीय श्री. उत्तम कांबळे
२१५, स्वरा सोसायटी,
अगरवाल नगर,
महाड, रायगड - 400562
[email protected]
विषय: 'जीवनज्योती विद्यालयाच्या' कथाकथन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत.
माननीय महोदय,
मी दीपक माने, जीवनज्योती विद्यालय, नांदगावचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे. दरवर्षी आमच्या शाळेमध्ये कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षपद आपण भूषवावे अशी आम्हां सर्वांची इच्छा आहे. आम्हां विद्यार्थ्यांना तुमचे विचार ऐकण्याची व मार्गदर्शन मिळवण्याची संधी यामुळे मिळेल. तरी दिनांक २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणार्या या समारंभास आपण अध्यक्ष म्हणून उपस्थित राहावे, अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण या समारंभास उपस्थित राहून विजेत्यांना व आम्हां सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल असा आम्हांला विश्वास वाटतो.
धन्यवाद!
आपला कृपाभिलाषी,
अ.ब.क.
दीपक माने
जीवनज्योती विद्यालय,
नांदगाव, रत्नागिरा - 20486
[email protected]