Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.
लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी - ______
उत्तर
लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी कर्त्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
खालील आकृती पूर्ण करा.
खालील आकृती पूर्ण करा.
खालील आकृती पूर्ण करा.
महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.
कार्यात नेमकेपणा होता. |
↓ |
↓ |
↓ |
विचार पक्का झाला की |
↓ |
↓ |
हे केव्हा घडेल ते लिहा.
कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल ______
हे केव्हा घडेल ते लिहा.
स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल ______
चौकट पूर्ण करा.
लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा - ______
पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.
स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे - ______
‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.
‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. खालील आकृती पूर्ण करा. (२)
स्वातंत्र्यसमराच्या ऐन धुमाळीच्या काळात, म्हणजे १८ एप्रिल, १८५८ रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर १५ ऑगस्ट, १९४७ रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यांदेखत कमावले गेले; पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते, हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावरसुद्धा ती गुलामच राहील, हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे, की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र, खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते, की ती आपल्या गुलामीला दागिना मानीत असे! आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे, असे भासवले जात असेलही; पण, तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. सबब, तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे, हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते! तथापि, हे कार्य अतोनात कठीण आहे, हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे, असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. शांत सोशिकपणे, सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल, याची त्यांनी खूणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते! नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले, तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल, हे कळत होते. |
2. का ते लिहा. (२)
स्त्रीने शिक्षित व्हायलाच पाहिजे असे कर्व्यांना ठामपणे वाटत होते, कारण .......
3. स्वमत (३)
'२१ व्या शतकातील स्त्री' याविषयी तुमचे विचार लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. उत्तर लिहा. (२)
गणिताचा गुणधर्म: ______
अनाथ बालिकाश्रमाचे नामांतरानंतरचे नाव: ______
महर्षी कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रमा' ची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून 'हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था' असे त्यांनी तिचे नामांतर केले. 'पै पै चा निधी' व 'मुरुड निधी' त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती, की यांतील पै पै चा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे! कर्व्यांना जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव! कर्वे स्वत: मोटार वापरत नसत. मैलोनगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वत:चे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात, हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे, आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वत:च्याच विश्वात वावरतात, अशी कुरबूर, घरच्यांच्या मनांत घर करून राहिली होती. वस्तुत: समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती; पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही! नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत. विचार करत. विचार पक्का झाला, की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई, की त्यांच्या चित्तात काय चालले आहे! हे डावपेच नव्हते; उलटपक्षी, बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे, हेच श्रेयस्कर असते! |
2. का ते लिहा. (२)
महर्षी कर्वे यांच्या कार्याविषयी प्रश्न उपस्थित करायला समाज धजावला नाही .....
3. स्वमत (३)
'बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते' याविषयी तुमचे मत उताऱ्याच्या आधारे लिहा.