मराठी

पण रत्नप्रभा क्षणभर विचलित झाली. ती म्हणाली, “मी नखशिखांत दागिन्यांनी मढून तुमच्या घरी येईन. असे वचन मी माझ्या गुरुजींना दिलं आहे आणि मी दिलेला शब्द नेहमीच पाळते.” -

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) दागिने माचल
(ii) गुरु मागे फिरणे
(iii) चोर साडी
(iv) माघारी स्त्री
(v) नऊवारी शिष्य

 

       पण रत्नप्रभा क्षणभर विचलित झाली. ती म्हणाली, “मी नखशिखांत दागिन्यांनी मढून तुमच्या घरी येईन. असे वचन मी माझ्या गुरुजींना दिलं आहे आणि मी दिलेला शब्द नेहमीच पाळते.” पण मी माझ्या गुरुंना भेटून परत येताना हे सर्व दागिने तुम्हाला देईन.

       तिचं उत्तर ऐकून त्या चोराला फार आश्चर्य वाटलं. त्याने तिला जाऊ दिलं, पण तिच्यामागोमाग गुपचूप पाठलाग करत तोही निघाला. आता नक्की काय होणार, हे त्याला बघायचं होतं. रत्नप्रभा गुरुजींच्या घरी जाऊन पोहोचली. तिनं त्यांचा दरवाजा ठोकावला. गुरुजींनी दार उघडलं. दागिन्यांनी मढलेल्या रत्नप्रभेला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच, पण खेदही वाटला. ते म्हणाले, “मला वाटलं, तू माझं बोलणं विनोद समजून हसण्यावारी नेशील. तुला नाउमेद करण्यासाठी मी आपलं तसं म्हणालो. या एवढ्या संकटांना तोंड देऊन तू इथे येशील, असं मला मुळीच वाटलं नव्हतं. तू घरी जा, पोरी माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तू आपला शब्द पाळणारी स्त्री आहेस.”

       रत्नप्रभा माघारी फिरली, तेवढ्यात तो चोर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. ती त्याला म्हणाली, “मी तुम्हाला हे सगळे दागिने द्यायचं कबूल केलं होतं ना? तुम्ही ते घ्या.”

       त्यावर तो चोर हसून म्हणाला, “तुमच्यासारखी स्त्री सापडणं विरळाच. मला तुमच्याकडून काहीसुद्धा नको. तुमच्यासारखी माणसं काही नेहमी भेटत नसतात.”

२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

  1. गुरुकडे जाणारी - ______
  2. रत्नप्रभाचा पाठलाग करणारा - ______
थोडक्यात उत्तर

उत्तर

१. 

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) दागिने स्त्री
(ii) गुरु शिष्य
(iii) चोर माचल
(iv) माघारी मागे फिरणे
(v) नऊवारी साडी

२. 

  1. गुरुकडे जाणारी - रत्नप्रभा
  2. रत्नप्रभाचा पाठलाग करणारा - चोर
shaalaa.com
अपठित गद्यांश
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×