Advertisements
Advertisements
प्रश्न
प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे/पायऱ्या स्पष्ट करा.
लघु उत्तर
उत्तर
प्राण्यांमध्ये पोषणाचे विविध टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:
- अन्नग्रहण: शरीरात अन्न घेण्याच्या प्रक्रियेला अन्नग्रहण म्हणतात. मानवांमध्ये अन्नग्रहण हे तोंडाच्या पोकळीच्या मदतीने केले जाते.
- पाचन: अन्नाचे रूपांतर विद्रव्य घटकांत होणे यास "अन्नपचन" असे म्हणतात.
- शोषण: पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे.
- सात्मीकरण: शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जानिर्मिती केली जाणे.
- उत्सर्जन: पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्नघटक शरीराबाहेर टाकले जातात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5.4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [पृष्ठ १४६]