Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रकाशाचे कोणतेही रूप आनंददायक हे विधान जाता अस्ताला या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर
सूर्यादय व सूर्यास्तासमयी आकाशात दिसणारे प्रकाशाचे रंग, रूप डोळयांना सुखावणारे असतात. सूर्य अस्ताला जाऊ लागला, की कवीमन प्रकाशाच्या या रूपावर कविता करू लागते, तर चित्रकाराचा कुंचला अलगद रंगांची उधळण करू लागतो. त्या वेळचे निसर्गाचे ते रमणीय दृश्य पाहताना मन विचारांनी, आठवणींनी भरून येते.
सूर्योदयाचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर नवे चैतन्य निर्माण करतो. सूर्यास्ताचा प्रकाश मनाला शांतता व समाधानाचा अनुभव देत असतो.
दिवसभर कष्ट करणार्या कष्टकर्यांसाठी सूर्यास्ताचा प्रकाश विश्रांती घेऊन येतो. आजचा दिवस संपल्याची जाणीव करून देणारा हा क्षण मनात नव्या दिवसाची ओढही जागवतो. सरता प्रकाश भूतकाळात जमा होणार असतो व सुर्योदयाचा प्रकाश उज्ज्वल भविष्यकाळ घेऊन येत असतो. काहीवेळा अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची आशा मनात निर्माण करून, तर काही वेळा पूर्ण केलेल्या कामांचे समाधान चेहर्यावर उमटवून सूर्य आपल्या प्रकाशाचे विविध रंग आकाशात उधळत असतो. अगदी मिणमिणत्या पणतीचा प्रकाशही मनाला निश्चिंत करणारा ठरतो. सूर्य नसताना अंधाराला चिरण्याकरता हा प्रकाशही पुरेसा होता. अशाप्रकारे प्रकाशाचे कोणतेही रूप आनंददायी वाटते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
पणतीच्या उदाहरणातून 'जाता अस्ताला' कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावनांचे वर्णन शब्दबद्ध करा.
'जाता अस्ताला' कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
सूर्य ऊर्जेचा स्रोत या विषयावर जाता अस्ताला या कवितेच्या आधारे लिहा.
कवीने जाता अस्ताला मधील पणतीच्या प्रतीकातून काय सूचित केले आहे.