मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. (अ) भौगोलिकघटक(ब) ऐतिहासिकघटक(क) - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा.

भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.

(अ) भौगोलिक घटक
(ब) ऐतिहासिक घटक
(क) आर्थिक घटक
(ड) राजकीय घटक
(इ) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:

भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा.

(अ) भौगोलिक घटक
(ब) ऐतिहासिक घटक
(क) आर्थिक घटक
(ड) राजकीय घटक
(इ) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

स्पष्ट करा

उत्तर

(भौगोलिक घटक: दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी, तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार दिला आहे. उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे, याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे.

(ऐतिहासिक घटक: शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश होतो. पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक, सांस्कृतिक संबंधांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेल्या परिणामांचाही यात समावेश होतो. वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध ही मूल्ये ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान आखली गेली होती.

(आर्थिक घटक: वासाहतिक काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. आर्थिक मदतीबरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नाकारली आहे. आयात-पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. १९९१ नंतर उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबिल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले.

(राजकीय घटक: भारताचे परराष्ट्रधोरण बनवण्यात आणि राबवण्यात राजकीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

(आंतरराष्ट्रीय व्यवस्था: शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे.

shaalaa.com

Notes

Students should refer to the answer according to their question and preferred marks.

भारतीय परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: भारत आणि जग - स्वाध्याय [पृष्ठ ७०]

APPEARS IN

बालभारती Political Science [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 6 भारत आणि जग
स्वाध्याय | Q ५ | पृष्ठ ७०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×