Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
- निर्वासित ज्या राष्ट्रांत जातात तेथे निर्वासितांची संख्या वाढल्याने त्या राष्ट्रावरचा बोजा वाढून अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. यामुळे, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, महागाई वाढते.
- तसेच, स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा येते. गुन्हेगारीचेही प्रमाण वाढते, त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
अशाप्रकारच्या, अनेक समस्या निर्माण होत असल्याने निर्वासितांना आश्रय देण्यास आणि त्यांचे पुनर्वसन करण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाहीत.
shaalaa.com
निर्वासितांचे प्रश्न
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?