Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अलीकडच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.
टीपा लिहा
उत्तर १
- जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.
- विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे.
- अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांनी तसेच खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात.
त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.
shaalaa.com
उत्तर २
१. जहाज, रेल्वे व विमान या सोईंमुळे आजच्या काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे सहज शक्य झाले आहे.
२. जहाजांमुळे दूरवर असणारे समुद्रकिनार्यांवरचे देश जोडले गेले आहेत.
३. रेल्वेमुळे युरोप खंड जोडला गेला आहे. विमान प्रवासासाठी कमी वेळ लागत असल्याने जग जवळ आले आहे.
४. याशिवाय, आर्थिक उदारीकरणानंतर विविध कारणांच्या निमित्ताने पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.
त्यामुळेच, आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
shaalaa.com
पर्यटनाचा विकास
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?