Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
बडोदा संस्थानातील सामाजिक सुधारणेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
कारण सांगा
उत्तर
- बडोदा संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पुरोगामी धोरण आखले होते.
- यांनी अस्पृश्य-आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा हुकुम काढला.
- स्त्री-शिक्षणास प्रोत्साहन आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा त्यांनी सुरू केली.
- महाराजांनी राजवाड्यात सर्व जातींचे एकत्र सहभोजन, गाव तेथे ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सद्स्य किमान साक्षर पाहिजे, गाव तेथे वाचनालय, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, शालेय मुला-मुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले.
- शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम संस्थानात सुरू केले.
- बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह, संस्थानात विधवा स्त्रीबरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा देण्याचा त्यांनी कायदा केला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?