Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- संयुक्त राष्ट्रे या संघटनेने १९७५ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून घोषित केले होते.
- शांतता, विकास आणि स्त्री-पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती.
- भारत सरकारने १९७५ मध्ये डॉ. फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
- या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून महाराष्ट्रात १९७५ मध्ये ‘स्त्रीमुक्ती संघर्ष समिती’च्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली.
- सर्वच क्षेत्रांतील स्त्रियांचा या परिषदेत सहभाग होता. १९७८ मध्ये समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. लिंगभेद, जातिभेद, वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधात संघर्ष छेडण्याचे धोरण ठरले.
- १९७७ मध्ये सौदामिनी राव यांनी स्थापन केलेली पुण्यातील ‘स्त्रीमुक्ती आंदोलन समिती’, ‘बायजा’ हे द्वैमासिक, औरंगाबादमध्ये ‘स्त्री उवाच’, ‘मैत्रीण’, ‘स्त्री अन्यायविरोधी मंच’, कोल्हापूरमध्ये ‘महिला दक्षता समिती’, नाशिकमध्ये ‘महिला हक्क’, लातूरमधील ‘नारी प्रबोधन मंच’ असे गट तयार झाले.
- महाराष्ट्रभर हुंडा विरोधी संरक्षण समित्या स्थापन झाल्या. धुळे शहरात स्त्री अत्याचारविरोधी परिषद आयोजित करण्यात आली होती.
shaalaa.com
आंतरराष्ट्रीय महिला वर्ष
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?