Advertisements
Advertisements
प्रश्न
राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो?
थोडक्यात उत्तर
उत्तर
राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात, तर काही वेळेस पाणीवाटपावरून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात.
आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे, शेजारी देशांतून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची काही अन्य कारणे आहेत.
राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्परविरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकारण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते; परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते.
एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे यांमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.
shaalaa.com
राष्ट्रीय सुरक्षा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?