Advertisements
Advertisements
प्रश्न
रेल्वेच्या रुळांत ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा.
स्पष्ट करा
उत्तर
सर्व स्थायू पदार्थ गरम केल्यावर प्रसरण पावतात. रेल्वेच्या पटऱ्या स्टीलच्या बनवल्या जात असल्यामुळे त्या उन्हाळ्यात प्रसरण पावतात आणि हिवाळ्यात आकुंचन पावतात. ह्या प्रसरण आणि आकुंचन प्रक्रियायेमुळे रेल्वे रूळ वाकडे होतील, ज्यामुळे ट्रेन घसरून अपघात होऊ शकतात. रेल्वेच्या पटऱ्यांमध्ये ठराविक अंतरावर छोटी जागा ठेवली जाते, जेणेकरून प्रसरणामुळे पटऱ्या वाकणार नाहीत. उन्हाळ्यात हे अंतर कमी होते, आणि हिवाळ्यात हे अंतर वाढते, त्यामुळे पटऱ्यांची योग्य लांबी कायम राहते आणि सुरक्षितता राखली जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?