Advertisements
Advertisements
प्रश्न
उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) रिकाम्या जागा पूर्ण करा:
- गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे - ______
- मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत - ______
फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे: जैसे ऋतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी॥ ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच; पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची झाडे पाहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ. |
(2) आकृतिबंध पूर्ण करा:
(3) स्वमत:
चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
(1)
- गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे - पिंपळाची झाडे
- मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत - संत ज्ञानेश्वर
(2)
(3) चैत्र महिन्यात पिंपळाच्या झाडांवर नवी पालवी फुटते, जी गडद गुलाबी रंगाची असते. उन्हात ही पाने चमकतात आणि नजरेला भुरळ घालतात. जुन्या पानांची गळती होत असताना नवीन नाजूक पाने झाडावर फुलतात, जणू काही गुलाबी पताका झाडावर फडकत आहेत. वाऱ्याच्या झुळुकीने ही पाने सतत सळसळत राहतात, त्यामुळे झाडाला एक वेगळे चैतन्य प्राप्त होते. ही निसर्गाची एक अद्भुत आणि मोहक रचना आहे.