मराठी

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा! -

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!

गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;

मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;

हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों

अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा;

‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी;

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

(१) पुढील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. (2)

  1. सर्वामध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपणा जपतो.
  2. हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटते.

(२) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (2)

(अ) कवीची सदैव सोबत करणारी, म्हणजे ______.

(i) सूर्य
(ii) आसवे
(iii) दुःख
(iv) त्रास

(ब) कवीचा विश्वासघात करणारे, म्हणजे ______.

(i) आयुष्य
(ii) तात्पर्य
(iii) लळा
(iv) प्रेम

(३) अभिव्यक्ती- (४)

‘समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

(१) 

  1. रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
    गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
  2. राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
    हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

(२) (अ) कवीची सदैव सोबत करणारी, म्हणजे आसवे.

(ब) कवीचा विश्वासघात करणारे, म्हणजे आयुष्य.

(३) कविवर्य गझलकार सुरेश भट लिखित ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये समाजामध्ये स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करत असताना जे अनुभव आले ते अनुभव व्यक्त केले आहेत.

समाजाचा घटक म्हणून समाजातच वावरत असताना आपले आयुष्य जगत असता आपले वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. उदा. सुरेश भट हे पत्रकार, संपादक म्हणून कार्यरत असतानाच ते एक उत्तम कवी होते. त्यांनी मराठी साहित्य दालनात ‘गझल’ हा काव्यप्रकार पुनर्जिवित करून तो लोकप्रिय केला. त्यांनी अन्यायाखाली भरडला जाणारा समाज, सुख सुविधांपासून वंचित असलेला समाज आणि सुख सुविधांपासून दूर असलेला समाज याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. त्यांना न्याय देण्यासाठी आपला संघर्ष चालू ठेवला. तसेच ‘मी’ ची मानहानी करणारे, माणसांची दुटप्पी वृत्ती, स्वार्थी-ढोंगीपणा, समाजातील मूल्यहीनता त्यांनी आपल्या साहित्यातून प्रकट केली. या प्रश्नांशी अंतर्मुख होऊन अशा समाजाविरुद्ध आवाज उठविला. मात्र समाजातील स्वार्थी लोकांनी कवीबद्दल ‘सार’ सांगताना, तात्पर्य सांगताना दिशाभूल केली आहे. असे असताना स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या कवीचा स्वतःच्या कर्तृत्वावर अढळ विश्वास असल्यानेच अशा नैराश्य अंध:काराने ज्यांचे आयुष्य व्यापलेले आहे. त्यांच्यासाठी आपण मध्यरात्रीचा सूर्य बनून उभे आहोत हे त्यांच्या व्यक्तिमत्तातील सामर्थ्य, आत्मविश्वास विविध प्रतिमांतून व्यक्त होताना दिसून येते. पुढे त्यांच्या आयुष्यातील काळरात्र घालवून प्रकाश निर्माण करण्यासाठी अखंडितपणे आपण संघर्ष करणार असल्याचेही कवी स्पष्ट करतात. अशाप्रकारे स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात या विधानाचा अर्थ सांगता येईल.

shaalaa.com
रंग माझा वेगळा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×