Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी; कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा: माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी: |
(१) (2)
(i)
(ii)
- कवीची सदैव सोबत करणारी
- कवीची विश्वासघात करणारे
(२) (2)
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!”
या ओळींचा अर्थ लिहा.
(३) अभिव्यक्ती: (4)
‘समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’ सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर
(१) (i)
(ii)
- आसवे
- आयुष्य
(२) कविवर्य गझलसम्राट सुरेश भट लिखित ‘रंग माझा वेगळा’ या गझल काव्यातील या ओळी असून त्यांच्याच ‘रंग माझा वेगळा’ या गझलसंग्रहातून ही गझल घेतली आहे.
समाजामध्ये भौतिक सुखसमृद्धीने परिपूर्ण तर दुसरा भौतिक व ऐहिक सुखापासून वंचित, अन्यायाने भरडला गेलेला सोषिक वर्ग असे दोन वर्ग प्रामुख्याने होते. दुसऱ्या गटातील माणसांचे प्रश्न हाताळणारे, त्यांच्या दु:खाला वाचा फोडण्याचे काम कवीने केले आहे. सामाजिक वेदनांमुळे कविमन व्यथित झाले असता समाजातून कविमनाला आनंद मिळण्याऐवजी दुःखच होते. आयुष्य जगत असताना सुखद अनुभवापेक्षा दुःखद अनुभव वाट्याला येत असले तरी त्यातून माघार न घेता कशाप्रकारे जगले पाहिजे याचा धडा घेत कवी जगत आहेत. परंतु अशाप्रकारचे जगणे हे कधी वेळी व काळी सुरु केले हे समजले नसेल तरी माझ्याच आयुष्याने माझा गळा कापला, विश्वासघात केला. सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत त्यामुळे कवीमन उद्विग्न होते आणि आपले आयुष्यच आपल्याशी खेळी करत आहे, दगा देत आहे असे कवीला वाटते आणि म्हणूनच अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी न फोडता स्वतःच्या माथ्यावर फोडून घेण्याची कवीची कृती म्हणजे कवीचे मोठे यश आहे.
(३) कविवर्य गझलकार सुरेश भट लिखित ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कवीने समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी जे प्रयत्न कले त्यातून त्यांना ओलेले अनुभव या अनुभवावर प्रकाश टाकला आहे.
समाजाचे घटक म्हणून समाजात वावरताना आपले वेगळेपण जपण्यासाठी वेगळे प्रयत्न हे करावेच लागतात. प्रत्यक्ष कवी पत्रकार, संपादक म्हणून कार्यरत असतानाच ते एक उत्तम कवी होते. त्यांनी मराठी साहित्यच्या क्षेत्रात ‘गझल’ हा काव्यप्रकार पुनजीवित करून तो लोकप्रियही केला. तसेच समाजात अन्यायाखाली भरडला जाणारा समाज अनेक सुविधांपासून वंचित असलेला समाज आणि सुख-सुविधांपासून वंचित, दुरावलेला समाज त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. त्यांना न्याय देण्यासाठी आपला संघर्ष चालू ठेवला त्यामुळेच समाजात ‘मी’ ची मानहानी करणारे तसेच माणसांची दुटप्पी वृत्ती, स्वार्थ, ढोंगीपणा, समाजातील मूल्यहिनता त्यांनी आपल्या साहित्यातून प्रकट केली. अंतर्मुख होऊन अशा समाजाविरुद्ध आवाज उठविला. मात्र समाजातील स्वार्थी लोकांनी कवीबद्दल ‘सार’ सांगत असताना दिशाभूल केली आहे.
तरीही स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या कवीचा स्वतःच्या कर्तृत्त्वावर अढळविश्वास असल्यानेच अशा नैराश्य, अंधकाराने ज्यांचे आयुष्य व्यापलेले आहे त्यांच्यासाठी आपण मध्यरात्रीचा सूर्य बनून उभे आहोत. हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील सामर्थ्य, आत्मविश्वास कवी विविध प्रतिमांतून व्यक्त करत आहे. त्यांच्या आयुष्यातील काळरात्र घालवून प्रकाश निर्माण करण्यासाठी अखंडितपणे आपण संघर्ष करणार असल्याचे कवी स्पष्ट करत आहेत. उदाहरण डॉ. प्रकाश आमटे यांनीही आपल्या कार्यकर्तृत्त्वातून हेमलकसा येथे नंदनवन फुलविले ते समाजातील कुष्ठरोगी अंध, अपंग, आदिवासी अशा विविध वंचित व दुर्लक्षित घटकांना आत्मसन्मानाने जगणं जगता यावे यासाठी बाबा आमटे यांनीही अभूतपूर्व प्रयोजनातून जिवंत व चैतन्यमयतेचे प्रतीक म्हणून आनंदवन उभे केले. अशाप्रकारे समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.