Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
स्थळ गोखले नाट्यगृह, |
रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक नाट्य स्पर्धा दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८ वेळ - रात्री: ९:३० ते १२:३० प्रवेश - फक्त पासधारक* नियम व अटी लागू. |
नावनोंदणी |
तुमच्या नाटकासाठी | ||
वरील स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पत्र लिहा. |
उत्तर
अध्यक्ष,
जय हनुमान नाट्य मंडळ,
कराड.
दिनांक - ५ नोव्हेंबर, २०१८
प्रति,
मा. अध्यक्ष,
रसिक नाट्य मंडळ,
मिरज.
विषय: नाट्य स्पर्धेमध्ये प्रयोग करण्यास मिळण्याबाबत.
महोदय,
स. न. वि. वि.
मी जय हनुमान नाट्य मंडळ, कराड या संस्थेचा अध्यक्ष असून गेली चार-पाच वर्षे आम्ही “स्वराजरक्षक संभाजी” या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग निरनिराळ्या ठिकाणी करत आहोत.
आपल्या मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. १६ ते २० डिसेंबर, २०१८ पर्यंत आयोजित स्पर्धेमध्ये आमच्या मंडळाच्या नाटकाचा प्रयोग करण्यास मिळण्याबाबत या पत्राद्वार आपणास विनंती करीत आहे.
आमचे नाटक साधारणपणे तीन तास कालावधीचा असून त्यामध्ये दहा कलाकार आहेत. आपल्या अटी व नियमाप्रमाणे आम्ही आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छितो.
तरी या स्पर्धेत प्रवेश मिळावा ही विनंती.
कळावे,
आपला कृपाभिलाषी,
अनिल कदम,
(अध्यक्ष)