Advertisements
Advertisements
प्रश्न
शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.
लघु उत्तर
उत्तर
आपल्या भाषेमध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. बोलताना, लिहिताना आणि वाचताना योग्य आणि नेमका अर्थबोध होण्यासाठी आपल्याला वापरलेल्या शब्दाचा नेमका अर्थ माहीत असणे आवश्यक ठरते. हा अर्थ आपल्याला शब्दकोशाद्वारे समजून घेता येतो. शब्दकोशामध्ये वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी केलेली असते; त्यामुळे आपल्याला हवा असलेला शब्द चटकन शोधणे शक्य होते. शब्दकोशामध्ये शब्दाच्या विविध अर्थछटांबरोबरच शब्दांचे योग्य उच्चार, त्यांचा उगम, समानार्थी शब्द, संदर्भानुसार बदलणारे अर्थ हेदेखील दिलेले असतात. त्याद्वारे आपल्याला संबंधित शब्दाची परिपूर्ण माहिती मिळून शकते. त्यामुळे, आपल्याला भाषेचा मनापासून आनंद घेता येतो आणि आपली भाषा समृद्ध होण्यास मदत होते.
shaalaa.com
स्थूलवाचन 8th Std
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?