Advertisements
Advertisements
प्रश्न
सकारण लिहा.
बहमनी राज्याची पाच शकले झाली.
कारण सांगा
उत्तर
- बहमनी राज्याचा मुख्य वजीर - महमूद गावान - यांच्या मृत्युनंतर, बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढली.
- तसेच, विजयनगर राज्याबरोबरच्या संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला.
- विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्रपणे काम करू लागले.
- परिणामी, बहमनी राज्य पाच लहान तुकड्यांमध्ये विभागले गेले. वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंडाची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची पाच शकले झाली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?