Advertisements
Advertisements
प्रश्न
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर
शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक समस्या मांडल्या. त्यांचे स्वरूप साधारणपणे असे होते : सर्व घरकाम स्त्रीच्या अंगावर येऊन पडते. स्वत:साठी वेळ मिळत नाही. दिवसभर करीत असलेल्या कामाला कोणी किंमतही देत नाही. घरी केव्हाही, कधीही, कितीही पाहुणे येतात. आपल्यामुळे यजमान घरातल्या लोकांची किती गैरसोय होत असेल, याचे भान पाहणे बाळगत नाहीत. सासू-सुना यांच्यातील भांडणे, कार्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुष सहकाऱ्यांकडून होणारा त्रास, महाविद्यालयात शिकायला जाणाऱ्या मुलींना होणारा छेडछाडीचा त्रास, व्यसनी नवऱ्यांमुळे होणारी संसाराची वाताहत या स्वरूपाच्या बऱ्याच समस्या पुढे आल्या.
या समस्यांकडे पाहिल्यावर लक्षात येईल की, या सर्व समस्या स्त्रियांशी निगडित आहेत. या सर्व समस्या स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेल्या आहेत. स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाचे स्थान मिळत नाही. घरातली कष्टांची व वेळखाऊ कामे स्त्रियांच्याच माथी लादलेली आहेत, घरातली कामे महत्त्वाची असतातच. घरातल्या सगळ्यांनी ती पार पाडली पाहिजेत. त्या कामांबाबत सगळ्यांची समान जबाबदारी असली पाहिजे. तसे होत नाही.
सून म्हणून घरात आलेल्या नवीन मुलीला सगळे वातावरणच नवीन असते. तिच्या मनावर दडपण येईल, मोकळेपणाने वावरणे अवघड होईल, असे आपण वागता कामा नये. अजूनही अनेक सुशिक्षित लोकही स्त्रियांना कमी लेखतात. त्यामुळे उच्चपदस्थ स्त्रियांना याचा त्रास सहन करावा लागतो. छेडछाडीच्या प्रकारांबाबत तर बोलायलाच नको. यामुळे स्त्रिया सार्वजनिक वातावरणामध्ये मोकळेपणाने वावरू शकत नाहीत. याचा त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या नोकरी-व्यवसायावर परिणाम होतो. आपण सर्वांनी या समस्येकडे गंभीरपणे बघितले पाहिजे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
फरक स्पष्ट करा.
नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील कृती करा.
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटक अनेक कलांचा संगम
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
'युद्ध आणि शांती' ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.