Advertisements
Advertisements
प्रश्न
संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. स्पष्ट करा.
उत्तर
संपर्क साधण्यासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संदेशवहनाची साधने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. संदेशवहनाच्या उपग्रहासारख्या आधुनिक साधनांमुळे अंतर, अडथळ्यांवर मात झाली. व्यापार, वाणिज्य व अन्य वाहनांसाठी लक्षावधी लोकांची एकाच वेळेस अल्पावधीत संपर्क साधण्याच्या दृष्टीने दूरवाणी, स्पीडपोस्ट, भ्रमणध्वनी ही वैयक्तिक व आकाशवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी है सार्वजनिक, सार्वत्रिक प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण ठरतात. जगातील ताज्या घडामोडी, हवामानाचे अंदाज करून याबद्दलची माहिती व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ संदेशवहनाच्या साधनांमुळे शक्य होतो. संदेशवहनामुळे लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन राष्ट्रीय एकात्मता साधली जाते.
आधुनिक कृत्रिम उपग्रह संदेशवहनाच्या माध्यमांमुळे माहितीचा प्रसार अत्यंत वेगाने होत असून, माहितीचा पूर अशी ही संकल्पना आता वापरली जाते.
जगभरात आता भ्रमणध्वनी, इ-मेल आणि उपग्रह दळणवळणाचा व्याप प्रचंड वाढत असून; मानवाचे सर्व व्यवसाय तसेच व्यापार हे आता संदेशवहनाच्या साधनामुळेच शक्य आहे. एकाअर्थी संपूर्ण जगाचे एका छोट्या खेड्यात रूपांतर झाले असून, संदेशवहनामुळे जग अधिकाधिक जवळ येत चालले आहे. एकंदरीतच संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका प्रचंड वाढला असून, प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे, प्रदेशाचे आणि देशाचे विश्वच संदेशवहनाने व्यापलेले आहे.