Advertisements
Advertisements
प्रश्न
संधीपाद संघाचे उदाहरण ______ हे आहे.
पर्याय
विंचू
तारामासा
गांडूळ
हायड्रा
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
संधीपाद संघाचे उदाहरण विंचू हे आहे.
स्पष्टीकरण:
- या प्राण्यांना छोट्या - छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात.
- पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. म्हणून संधिपाद प्राणीसंघ हा प्राण्यांमधील सर्वांत मोठा आणि जीवन-संघर्षात सर्वप्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे.
- हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वांत उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासांत आढळतात.
- या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी, सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून ते खंडीभूतही असते.
- यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल (Exoskeleton) असते.
- हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणे: खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी, इत्यादी.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
नाकतोडा
खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
गोम
झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
फुलपाखरू
खालीलपैकी __________ हा उभयलिंगी प्राणी आहे.
वेगळा घटक ओळखा.
कोणत्या प्राण्याला तीन पायांच्या जोड्या असतात?
शास्त्रीय कारण लिहा.
झुरळ हया प्राण्याचा संधिपाद हया संघांत समावेश होतो.