Advertisements
Advertisements
प्रश्न
संकल्पना स्पष्ट करा.
न्यायालयीन पुनर्विलोकन
स्पष्ट करा
उत्तर
सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचे संरक्षण करणे होय. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो. हे तुम्हांला माहीत आहे. या कायद्याचा भंग होईल अथवा त्या विरोधी असेल असे कायदे संसदेला करता येत नाहीत. कार्यकारी मंडळाचेही प्रत्येक धोरण आणि कृती संविधानाशी सुसंगत असावी लागते. संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असल्यास तो कायदा आणि ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते व रद्द करते. न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?