Advertisements
Advertisements
प्रश्न
संकल्पना स्पष्ट करा.
सार्वभौम राज्य
स्पष्ट करा
उत्तर
- सार्वभौम राज्य म्हणजे असे राज्य जे परकीय शक्तीच्या नियंत्रणाखाली नसते.
- आपल्या संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय.
- लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासनसंस्थेला असतो.
- अशाप्रकारे, आपले संविधान सार्वभौमत्वाचे तत्व प्रतिबिंबित करते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?