Advertisements
Advertisements
प्रश्न
संसद मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- चर्चा, विचार-विनिमय, प्रश्नोत्तरे आणि अविश्वास प्रस्ताव यांसारख्या विविध मार्गांनी संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते.
- मंत्रिमंडळाला कोणतेही धोरण किंवा कायद्याची अंमलबजावणी करायची असल्यास त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणावी लागते. अशा वेळेस अनेकदा काही मुद्यांवरून मतभेद दिसतात. सभासदांचे समाधान न झाल्यास ते सभा त्यागही करतात.
- अधिवेशन काळातील दुपारी १२ चा वेळ शुन्य प्रहर म्हणून ओळखला जातो. या वेळी सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणता येते.
- याशिवाय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे अविश्वास ठराव. सरकारचे एखादे धोरण सदस्यांना खटकणारे असेल तर ते सरकारवर अविश्वास ठराव आणू शकतात. असे झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?