Advertisements
Advertisements
प्रश्न
स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही.
उत्तर
एखाद्या ठरावीक ठिकाणी कायम वस्ती करून राहणे हा सध्या मानवाचा स्थायीभाव झाला आहे. त्यामुळे स्थलांतर हा घटकच मुळात कुठल्यातरी कारणामुळे व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पाडते. कारण काही वेळेस आकर्षणही असते, रोजगाराची संधी, उत्तम राहणीमान, आल्हाददायक हवामान यांसारख्या काही आकर्षक कारणांमुळे व्यक्ती स्वतःहून स्थलांतरित होते. त्यामुळे असे स्थलांतर बहुतांशी कायमस्वरूपी असते. मात्र, आकर्षणापेक्षाही अपकर्षक कारणामुळे होणारे स्थलांतर व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध असते. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक संघर्ष किंवा कलह, देशाच्या किंवा प्रदेशाच्या फाळणीसारखी राजकीय कारणे अशा अपकर्षणांमुळे जेव्हा स्थलांतर होते, तेव्हा असे स्थलांतर हे कायमस्वरूपी असते असे नाही. त्यामुळेच प्रत्येक स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असत नाही.