Advertisements
Advertisements
प्रश्न
सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
स्पष्ट करा
उत्तर
सूक्ष्म अर्थशास्त्र ही आधुनिक अर्थशास्त्राची एक शाखा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या एका लहान भागाशी संबंधित आहे. ते वैयक्तिक ग्राहक, वैयक्तिक उत्पादक, वैयक्तिक कंपन्या, विशिष्ट वस्तू किंवा घटकाची किंमत इत्यादी वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते.
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- वैयक्तिक घटकांचा अभ्यास: सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुंटुंब संस्था, वैयक्तिक किंमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो.
- किंमत सिद्धांत: सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितींशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितींशी संबंधीत आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात.
- विभाजन पद्धत: सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे, तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन-पद्धतीचा वापर केला जातो.
- आंशिक समतोल: सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोल पद्धत वापरते, म्हणजे इतर सर्व गोष्टी स्थिर आहेत असे गृहीत धरून एका घटकाचा अभ्यास केला जातो. यात विविध आर्थिक घटकांमधील परस्परावलंबनाचा विचार केला जात नाही.
- विशिष्ट गृहीतकांवर आधारित: ‘इतर परिस्थिती कायम’ या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते.
- सूक्ष्म दृष्टीकोन: जसे सूक्ष्मदर्शक वापरून लहान गोष्टी मोठ्या प्रमाणात पाहता येतात, तसेच सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा विस्तृत अभ्यास करते. यामुळे व्यक्तिगत ग्राहक आणि उत्पादक कसे कार्य करतात आणि समतोल स्थितीत कसे पोहोचतात याचा अभ्यास केला जातो.
- सीमांत तत्त्वाचा वापर: सीमांत संकल्पना ही सूक्ष्म-आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्त्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम, उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो.
- बाजार रचनेचे विश्लेषण: सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते.
- मर्यादित व्याप्ती: सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी-मंदी, व्यवहारतोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यांसारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?