Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
‘स्वच्छता हीच देशसेवा’ स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता शालेय परिसर स्वच्छता |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा. |
उत्तर
दिनांक - २८ सप्टेंबर, २०१८
प्रति,
माननीय अमित देशमुख,
वरिष्ठ सेवक,
सरस्वती शाळा, सांगली.
विषय: स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करण्याबाबत
महोदय,
स. न. वि. वि.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आपल्या शाळेत स्वच्छता सप्ताह निमित्त दिनांक २ ऑक्टोबर रोजी शालेय परिसर स्वच्छता मोहीम करण्याचा कार्यक्रम सकाळी १०:०० वाजता आयोजित केला आहे.
शाळेतील बरेच विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. स्वच्छतेसाठी आम्हांला काही साहित्याची आवश्यकता आहे. तेव्हा त्याची यादी या पत्रासोबत जोडली आहे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी हे काम करून घेणार असल्यामुळे सोबतच्या यादीप्रमाणे साहित्य मिळावे ही विनंती.
स्वच्छता करण्यासाठी लागणारे साहित्य:
(१) २५ झाड़ू
(२) ५० कापडी पिशव्या
(३) २०० हात मोजे
(४) ४० कचरा पेट्या
(५) १०० मास्क
(६) १० पाण्याचे मोठे मग
आपली कृपाभिलाषी,
निशा जाधव
(विद्यार्थी प्रतिनिधी)
सरस्वती शाळा, सांगली