Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
लेखिकेने कांबळे गुरुजींबद्दल व्यक्त केलेली भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
लेखिका गरीब घरातल्या होत्या. त्यांच्या घराण्यात कोणी शाळेची पायरीसुद्धा चढली नव्हती. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा येत होता. त्या म्हशींना सांभाळत शाळा पण शिकायला येत असत. कधी कधी शाळेत जायला भेट नसे. कधी कधी त्यांना खूप उशीर होत असे. त्या पाटीचा फुटका तुकडा आणि फाटके पुस्तक घेऊन त्या शाळेत जात. त्या शाळेत उशिरा गेल्या की, वांदिले गुरुजी त्यांच्याकडे रागाने बघत. अशा परिस्थितीत कांबळे गुरुजींनी त्यांच्यावर खूप माया केली. लेखिका शाळेत उशिरा पोहोचल्या, तरी कांबळे गुरुजी रागावत नसत. गुरुजी त्यांना पाटीवर 'ग, म' लिहून देत. परत परत लिहायला सांगत. लेखिका जेवल्या की नाही, याचीही ते आपुलकीने चौकशी करीत. लेखिका ज्या थोड्याफार शिकल्या त्याचे सर्व श्रेय त्या कांबळे गुरुजींना देतात. त्यांच्या वाळवंटासारख्या रखरखीत आयुष्यात कांबळे गुरुजी जणू सावली झाले होते, अशी आदराची भावना लेखिका कांबळे गुरुजींविषयी व्यक्त करतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चिंधीला शाळा शिकण्यास मनाई होती, कारण ______
चिंधीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला, कारण ______.
बुनियादी ग्रामशाळेतील शिक्षकांची नावे - ______, ______
चिंधी लहानपणी कागद-पेन म्हणून वापर करत होती ती वनस्पती - ______
स्वमत.
सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे पाठाच्या आधारे पटवून द्या.