Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत लिहा.
'भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
लघु उत्तर
उत्तर
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. चिखल-मातीत पाय रोवून तो कष्ट करतो. तो त्याचा घाम गाळत असतो. त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात. प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की, जणू शेतकऱ्याचा घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो. त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात; त्या वेळी आकाशाला पान्हा फुटतो. शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झरतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?