मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

स्वमत. ‘तुले देले रे देवानं, दोन हात दहा बोटं।’ ही ओळ काय सुचवते ते तुमच्या शब्दांत सांगा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

‘तुले देले रे देवानं, दोन हात दहा बोटं।’ ही ओळ काय सुचवते ते तुमच्या शब्दांत सांगा.

टीपा लिहा

उत्तर

बहिणाबाई चौधरी यांनी 'खोप्यामधी खोपा' या कवितेमध्ये सुगरणीने बांधलेल्या सुंदर घरट्याचे वर्णन करताना पाखराची कारागिरी व माणसाचे कर्तृत्व यांची तुलना करून माणसाला मोलाचा सल्ला दिला आहे. कवयित्री म्हणतात - सुगरणीची चोच इवलीशी असते. तेच तिचे दात व ओठ असतात. त्या चिमुकल्या चोचीने अतिसुंदर असे घरटे विणते. अरे, माणसा तुला तर देवाने तुझी कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी दोन हात आणि दहा बोटे दिली आहेत. तू पाखरांपेक्षा अधिक कौशल्यपूर्ण व सौंदर्यपूर्ण निर्मिती कर. सुगरणीच्या खोप्याच्या प्रतीकातून बहिणाबाईंनी माणसाला रास्त उपदेश केला आहे व त्याच्या कलेला सार्थ आवाहन केले आहे. 

shaalaa.com
खोप्यामधी खोपा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: खोप्यामधी खोपा - कृती [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 5 खोप्यामधी खोपा
कृती | Q (५) (३) | पृष्ठ १३

संबंधित प्रश्‍न

फरक स्पष्ट करा.

सुगरण माणूस
   
   

खालील आकृती पूर्ण करा.


खालील आकृती पूर्ण करा.


‘पिलं’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


स्वमत.

सुगरणीला तिच्या बाळाची काळजी असते, हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.


स्वमत.

सुगरणीला तिच्या पिलांची काळजी वाटते तशी तुमच्या आईलाही तुमची काळजी वाटते, हे सोदाहरण स्पष्ट करा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)

(1) आकृती पूर्ण करा: (2)

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला।

पिलं निजले खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला।

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।

(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×