Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते? का?
लघु उत्तर
उत्तर
स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते. कारण वनस्पतींची संख्या जास्त असेल, तरच त्यावर गुजराण करणारे प्राणी तग धरून राहतील. जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले, तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव पण नष्ट होतील. म्हणून निसर्गातील अन्नसाखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवांपेक्षा जास्त संख्येने असतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?