Advertisements
Advertisements
प्रश्न
तांब्याचे नाणे सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणात बुडविले असता, थोड्या वेळाने त्या नाण्यावर चकाकी दिसते. असे का घडते? रासायनिक समीकरण लिहा.
टीपा लिहा
उत्तर
तांब्याचे नाणे सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणात बुडवले असता, जास्त क्रियाशील तांबे सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणातील कमी क्रियाशील सिल्व्हरची जागा घेते. अशा रितीने बाहेर पडलेल्या सिल्व्हरचा तांब्याच्या नाण्यावर थर जमा होतो. म्हणून थोड्या वेळाने सिल्व्हरची चकाकी नाण्यावर दिसते.
\[\ce{Cu_{(s)} + 2AgNO3_{(aq)}-> Cu(NO3)2_{(aq)} + 2Ag_{(s)}}\]
shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे शुद्धीकरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?