मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

टीप लिहा. जहाल विचारसरणी - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

जहाल विचारसरणी 

टीपा लिहा

उत्तर

(१) स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभे करून अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे, या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्यांच्या गटाला 'जहालवादी' असे म्हणतात.

(२) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात 'आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा' हा वाद सुरू झाला. स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल, ही जहाल गटाची विचारसरणी होती.

(३) आपले घर आपण आधी ताब्यात घेऊ, मग हव्या त्या सुधारणा करू, असे जहालवाद्यांचा म्हणणे होते.

(४) स्वातंत्र्य मिळवणे हे मवाळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच असले तरी दोन्हींच्या कार्यपद्धतींबाबत त्यांच्यात मतभेद होते. अर्ज-विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बधणार नाही, असे जहालवाद यांचे मत होते.

(५) मवाळवाद्यांच्या सनदशीर मार्गावर जहालवादयांचा विश्वास नव्हता.

shaalaa.com
मवाळ - जहाल विचारसरणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ ५२]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
स्वाध्याय | Q ३.१ | पृष्ठ ५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×