मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात. त्यांना आपत्ती म्हणतात. नद्यांना येणारे पूर, ओला व कोरडा दुष्काळ, वादळे, भूकंप, ज्वालामुखी या काही प्रमुख नैसर्गिक आपत्ती होत. मानवावर अचानक ओढवलेली संकटे होत. या घटनांमुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन घडून येते तसेच अशा विध्वंसक घटनांपासून पर्यावरणाला हानी पोहोचते.
  2. पर्यावरणातील साधनसंपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यातून अचानक व मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात. त्यांना मानवनिर्मित आपत्ती म्हणता येईल.
  3. आपत्ती लहान असो वा मोठी, अल्पकालीन असो वा दीर्घकालीन, त्यावर मात करणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आपत्तीव्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणे गरजेचे आहे. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.
  4. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपत्ती या नियोजित नसतात परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते.
  5. आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय, काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी वाढ करणे. जसे की आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार होऊन त्याचा कृती आराखडा तयार करणे व या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणे.
shaalaa.com
धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 3. उ. | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×