मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा. भारत-ब्रझील हवामान तुलना - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

भारत-ब्रझील हवामान तुलना

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. भारत व ब्राझील हे दोन्ही देश उष्ण कटिबंधीय असले तरी भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे, तर ब्राझीलचे हवामान विषुववृत्तीय भागात उष्ण, तर मकरवृत्ताजवळ समशीतोष्ण प्रकारचे आहे.
  2. भारताच्या मध्यातून जाणाऱ्या कर्कवृत्ताच्या जवळील भागात लंबरूप सूर्यकिरणांमुळे वर्षभर तापमान अधिक असते, तर ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळील ॲमेझॉन खोऱ्यात सरासरी तापमान जास्त (२५° ते २८° से) असते.
  3. तापमानाच्या दृष्टीने भारताचा उत्तरेकडील प्रदेश थंड आहे. जम्मू-काश्मीर व हिमालयीन पर्वत क्षेत्रात हिवाळ्यात –४०° से. इतके तापमान असते, तर तुलनेने दक्षिणेकडील प्रदेश उष्ण आहे. याउलट, ब्राझीलच्या उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे, तर दक्षिणेकडील पठारी प्रदेशात हवामान थंड आहे.
  4. भारताला नैऋत्य मौसमी वाऱ्यांमुळे पाऊस मिळतो व बहुतेक पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा असतो, तर ब्राझील देशाला आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय (व्यापारी) वाऱ्यांपासून प्रतिरोध प्रकारचाच पाऊस मिळतो. तसेच, ॲमेझॉनच्या खोऱ्यात दररोज अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो.
  5. भारताच्या पश्चिमेस गुजरात व राजस्थानमध्ये पाऊस अतिशय कमी पडतो. त्यामुळे, तेथे अवर्षण स्थिती आहे, तर ब्राझीलच्या ईशान्येकडील प्रदेशात पाऊस अतिशय कमी पडतो.
  6. भारतामध्ये उष्ण कटिबंधीय वादळे पाहावयास मिळतात, तर ब्राझीलमध्ये या प्रकारची वादळे फार क्वचितच आढळतात.
shaalaa.com
हवामान
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: हवामान - टिपा लिहा.

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.

बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्राँडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.

प्रदेश भारत ब्राझील
जास्त पावसाचे    
मध्यम पावसाचे    
कमी पावसाचे    

भौगोलिक कारणे लिहा:

मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.


योग्य जोड्या जुळवा.

  'अ' स्तंभ   'ब' स्तंभ
१. मॅनॉस अ. कमी पावसाचा प्रदेश
२. राजस्थान ब. केंद्रित वस्ती
३. ब्राझील उच्चभूमी क. बंगालचा वाघ
४. उत्तर भारतीय मैदान ड.  गवताळ प्रदेशातील प्राणी
    इ. दलदलीचा प्रदेश
    फ. तापमान कक्षेत फारसा फरक नाही.

फरक स्पष्ट करा.

हवा व हवामान


टीपा लिहा.

हवामानाचे घटक


दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक ______ हा आहे.


दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना ______ असे म्हणतात.


दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

मानवाने कितीही प्रगती केली तरी ______ चा विचार करावाच लागतो.


दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन ______ होय.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×