Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
पर्यटनाची परंपरा.
टीपा लिहा
उत्तर
- अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला.
- भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा-यात्रांमध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे त्याचे धार्मिक पर्यटन होते.
- व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई. विदयाभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठांत शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत.
- मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.
shaalaa.com
पर्यटनाची परंपरा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?