Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
स्थळकोश
उत्तर
१. इतिहासाच्या अभ्यासाकरता भूगोलदेखील महत्त्वाचा असल्याने विविध ऐतिहासिक स्थळांच्या संबंधित माहिती देणारे कोश तयार करण्यात आले आहेत.
२. १४ व्या शतकात महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेल्या 'स्थानपोथी' या ग्रंथामध्ये महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी ज्या-ज्या गावांमध्ये गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. या ग्रंथांवरून तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना येते.
३. याशिवाय, चक्रधरस्वामींसंबंधित लीळाचरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या याचा उल्लेखदेखील यामध्ये असल्याने हा एक उत्तम संदर्भग्रंथदेखील आहे.
४. याव्यतिरिक्त, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी १९६९ मध्ये प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली आहे. यामध्ये वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकीरामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत व शब्दकोश साहित्य, तसेच बौद्ध, जैन, ग्रीक, फार्सी शिलालेख आणि चिनी साहित्य यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती दिली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टीपा लिहा.
स्थळ कोश
टीपा लिहा.
विश्वकोश
टीपा लिहा.
संज्ञा कोश
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड ______ यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील ______ हा महत्त्वाचा कोश आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कोश वाङ्मयाच्या प्रकाशन वर्षाचा तक्ता पूर्ण करा.
टीपा लिहा.
भारतीय संस्कृती कोश
इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा.