Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोश
टीपा लिहा
उत्तर
१९३८ साली मुंबई येथे स्वा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' पार पडले. यात 'व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे' असा ठराव मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवली गेली. व्युत्पत्ती कोशनिर्मितीसाठी बॅ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले. श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी कोशास पुरस्कृत केले. यामुळे, कोशनिर्मितीस मोलाची मदत झाली. १९४६ साली या कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतर या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे प्रामुख्याने चार प्रकारचे असते, ते पुढीलप्रमाणे:
अ. शब्दाचे मूळ रूप दाखवणे
ब. अर्थांतील बदल स्पष्ट करणे
क. उच्चारातील बदल व फरक दाखवणे
ड. बदलांचे कारण स्पष्ट करणे
shaalaa.com
व्युत्पत्ती कोश
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?