Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत लिहा.
ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत.
लघु उत्तर
उत्तर
एका दिवसात एक खंड वाचून होणे शक्यच नसते. वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता. एखादे पुस्तक वरवर चाळून ते आपल्या उपयोगाचे नाही, हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात. पण स्वामींनी मात्र दिवसाला एक खंड याप्रमाणे तीन दिवसांत तीन खंड वाचून परत केले. हे तीन खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही. काही वाचक आपल्याला वाचनवेड आहे, असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडायचा प्रयत्न करतात. बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरुपयोग करतात. या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?