Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा.
संत एकनाथ
दीर्घउत्तर
उत्तर
- महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांनी अभंग, भारुडे, गौळणी अशी विविध प्रकारची साहित्य निर्मिती केली.
- त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे.
- त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तीविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला.
- मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही, असे ते सांगत
- परमार्थप्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले.
- इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर त्यांनी कडक टिका केली. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?