Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्याचा अभ्यास करतात' या विधानामागील कारण.
लघु उत्तर
उत्तर
लिओनार्दो यांनी अनेक यंत्रे तयार केली. इमारती बांधल्या, पूल बांधले, अनेक गोष्टींचे शोध लावले आराखडे तयार केले. आज दिसणाऱ्या हेलिकॉप्टर्सचे आराखडे त्यांनी त्या काळात तयार केले होते. सायकल अस्तित्वात येण्याच्या तीनशे वर्षे आधी त्यांनी सायकलचा आराखडा तयार केला होता. आपल्या सर्व शोधांची माहिती, यंत्रांचे, वस्तूंचे आराखडे, त्यांची गणिते हे सर्व लिओनार्दो यानी आपल्या नोंदवह्यांत लिहून ठेवले आहेत. त्यामुळेच, त्यांनी निर्माण केलेली तंत्रे, त्यांचे शोध, त्यांच्या कल्पना हे सारे समजून घेण्यासाठी लोक आजही त्यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?