Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'चित्रकार' म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे.
लघु उत्तर
उत्तर
लिओनार्दो यांनी चित्रकार होण्यासाठी अपार कष्ट घेतले. तेरा-चौदा वर्षे त्यांनी त्या काळातल्या श्रेष्ठ चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले. आपली चित्रे खरीखुरी वाटावीत म्हणून ते सर्व गोष्टींचे सूक्ष्मपणे निरीक्षण करीत असत. साप, पाली, सरडे असे अनेक प्राणी जंगलातून पकडून आणून ते त्यांचे निरीक्षण करीत. अशाप्रकारे चित्र तयार करण्यापूर्वी ते सर्व अंगांनी सूक्ष्मपणे अभ्यास करीत. असा अभ्यास आणि त्यांची प्रतिभाशक्ती यांमुळे मॅडोना ऑन दी रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा ही त्याची चित्रे जगभर गाजली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?