Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
एकदा हिवाळ्यात आम्ही काही मित्रमैत्रिणी पाचगणीला गेलो होतो. जिथे मी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी तीन दिवस घालवले तिथे आम्हांला एकही वेळा स्वच्छ आकाश पाहायला मिळाले नाही. संपूर्ण परिसर धुक्याने घेरलेला होता. झाडांवर धुक्याच्या चादरी सारखे पांघरूण दिसत होते, आणि तोंडाने फुंकर मारल्यावर धुक्याची धुरासारखी वलये उमटत होती. आम्ही रस्त्यावर चालत असताना एक विलक्षण अनुभव आला. अवतीभवती शिरिषाची विस्तारलेल्या फांद्यांची खूप झाडे होती. अचानक एक क्षणासाठी ढगातून सूर्याची फिकट कोवळी किरणे धुक्याने लपेटलेल्या झाडातून खाली उतरली नि झाडाच्या तळाशी सूर्यप्रकाशाच्या गोल-गोल चकत्या उमटल्या. या क्षणी मला अशोक बागवे यांच्या कवितेची ओळ 'सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे। मखमलीची झीळ त्याला हिर्वळे दर्वळे' आठवली. धुक्याच्या दिवसांतील हा विशेष क्षण माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे -
तुलना करा.
भारतामधील धुके | लंडनमधील धुके |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
(४) | (४) |
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
‘हिवाळ्यातील एक क्षण’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
तुमच्या आवडत्या ॠतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.