Advertisements
Advertisements
प्रश्न
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर
माझा पश्चिम घाटातील भीमाशंकर अभयारण्यातील प्रवास अविस्मरणीय होता. आम्ही भर पावसात ट्रेक करण्यासाठी भीमाशंकरला गेलो होतो. वर टेकडीवर शंकराचे मंदिर पाहिल्यावर आम्ही आजूबाजूचा वन्य परिसर पाहिला. घनदाट झाडी, अनेक प्रकारची झाडे आणि पक्षी – पाखरांच्या आवाजात आम्ही जंगलाची पायवाट तुडवत होतो. महाराष्ट्राचे मानचिन्ह मानले जाणाऱ्या शेकरू या प्राण्याचे भीमाशंकर हे माहेरघर आहे. त्यामुळे, शेकरू दर्शनाची आम्हांला ओढ लागली होती. शेकरू व्यतिरिक्त या जंगलात बिबट्या, वाघ, सांबर, हरीण, कोल्हा, साळींदर, लांडगे, वानर, मोर यांसारखे वन्यजीवही वास करतात. त्यामुळे, आम्ही सावधपणे पुढे जात होतो.
जोराचा पाऊस होता, अशावेळी प्राणी शक्यतो बाहेर पडत नाहीत, त्यामुळे आम्ही सुरक्षित होतो. दुपारहून पाऊस ओसरला. आम्ही थोड्या मोकळ्या भागात विश्रांतीसाठी थांबलो. जवळपास जांभूळ, बोरांची झाडे होती. मध्येच झाडांची पाने सळसळली, त्या दिशेने पाहिले तर दोन शेकरू एका उंच झाडावर चढत होते. वर त्यांचे घरटे असावे. ती नर– मादीची जोडी होती. शेकरू अतिशय गोंडस दिसतो व थोडा घाबरट, लाजाळू असतो. ते माणसांच्या जवळ येत नाही. आम्हांला पाहून ते शेकरू जे झाडावर चढले ते खाली उतरलेच नाहीत; पण भीमाशंकरला येण्यामागची आमची इच्छा पूर्ण झाली होती. आम्हांला शेकरूदर्शन झाले होते !
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.
भौगोलिक वैशिष्ट्ये
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा.
प्राणिजीवन
टीपा लिहा.
एकशिंगी गेंडा
टीपा लिहा.
गेंड्याच्या सवयी
टीपा लिहा.
गायबगळे
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.