Advertisements
Advertisements
प्रश्न
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
भीष्म प्रतिज्ञा
उत्तर
महाभारत या महाकाव्यातील भीष्माने आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ही प्रतिज्ञा त्याने जीवनाच्या अंतापर्यंत पाळली होती. त्यामुळे, तेवढ्या ताकदीने केलेल्या प्रतिज्ञेस भीष्म प्रतिज्ञा म्हणण्याचा प्रघात पडला. पाठामध्येही लेखकाने आपले अति प्रमाणात वाढलेले वजन कमी करण्याची प्रतिज्ञा केली आहे. ती प्रतिज्ञा साधीसुधी नसून ती भीष्म प्रतिज्ञा आहे असे लेखक मोठ्या उत्साहाने म्हणतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
कारणे शोधा.
वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ___
कारणे शोधा.
बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ___
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
बाळसेदार भाज्या-
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
असामान्य मनोनिग्रह -
तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.
दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.
'उपास' या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. का ते लिहा. (2)
- लेखकांना ताटातले पदार्थाच्या जागी नुसते ‘कॅलरीज’ दिसू लागल्या, कारण ______.
- “तू बटाटा सोड” अशा सल्ला सोकाजींनी लेखकांना दिला, कारण ______.
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. ‘‘घोरत तर असता रात्रभर!’’ अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. ‘‘दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ- सोकाजी त्रिलोकेकर. ‘‘तुला सांगतो मी पंत, ‘डाएट’ कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.’’ ‘‘हो! ‘म्हणजे कुठं राहाता?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहातो’ म्हणा. ‘बटाट्याची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!’’ जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ‘‘ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.’’ मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. स्वमत (3)
लेखकांना वजन कमी करण्याबाबत आलेले अनुभव कसे सांगितले ते सांग.