Advertisements
Advertisements
प्रश्न
उपभू स्थितीत कोणत्या प्रकारचे सूर्यग्रहणे होतील?
दीर्घउत्तर
उत्तर
उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहण होतील.
- खग्रास सूर्यग्रहण: मध्यभागात सावली दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते, तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय.
- खंडग्रास सूर्यग्रहण: त्याच वेळी विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते, ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागात अनुभवता येते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?