Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कृती सोडवा. (२)
- हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद -
- मराठी भाषेची खास शैली -
परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. |
२) आकृतिबंध पूर्ण करा. (२)
३) स्वमत कृती: (३)
'तुम्ही शहाणे आहात' या वाक्यातील 'शहाणे' या शब्दाच्या अर्थछटा लिहा.
उत्तर
१)
- हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद - बनवणे
- मराठी भाषेची खास शैली - वाक्प्रचार
२)
भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय |
शब्दकोशाचा वापर करण्याची सवय लावणे. |
क्रियापद वापरताना नामाला योग्य प्रत्यय लावणे. | |
वाक्यात योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे. |
३) 'शहाणे' या शब्दातून दोन अर्थछटा निर्माण होतात. त्यातून सुज्ञ, समजूतदार असा एक अर्थ, तर 'अतिशहाणा' हा दुसरा अर्थ व्यक्त होतो. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करत सारासार विचार करणार्या व्यक्तीकरता 'शहाणे' असा शब्दप्रयोग केला जातो, तर स्वत:ला हुशार समजून बढाई मारणाऱ्या किंवा स्वभावाने आगाऊ असलेल्या व्यक्तीला 'अतिशहाणा' असे म्हटले जाते. म्हणजेच, पहिल्या अर्थछटेत गुण, तर दुसऱ्या अर्थछटेत दुर्गुण अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो.
उदा. चांगले वागणाऱ्या, चांगले काम करणाऱ्या मुलाबद्दल बोलताना आई 'माझा बाळ शहाणा आहे' असं म्हणते. आगाऊपणे वागणाऱ्या मनुष्यास 'शहाणा झालास का रे?' किंवा 'तो जरा अतिशहाणाच आहे' असे म्हटले जाते. अशाप्रकारे, 'शहाणे' या एकाच शब्दातून वेगवेगळ्या अर्थछटा निर्माण होतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृत्या पूर्ण करा.
आकृत्या पूर्ण करा.
शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा.
पाठाच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.
मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा - ______
पाठाच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.
शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन - ______
गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.
गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.
गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.
‘तुम्ही शहाणे आहात’ या वाक्यातील ‘शहाणे’ या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.
‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.
लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (2)
भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. 'टेबल' हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. 'मी स्टडी केली' म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी 'मी अभ्यास केला' म्हणणं योग्य नाही का? भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. 'मोरांबा' या शब्दातल्या 'मोरा' चा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी (जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस) संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, ते त्यातून कळते. 'कदर करणे' असे आपण म्हणतो. तो वाक्प्रचार आहे. 'कद्र' या अरबी शब्दापासून 'कदर' (म्हणजे गुणांची पारख) हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो, की आपल्या चुकाही होत नाहीत. उदा., 'अनुसया' असे नाव नसून ते 'अनसूया' असे आहे. 'अन् +असूया' अशी त्यातील संधी आहे. मनात असूया (मत्सर) नसलेली अशी ती 'अनसूया' हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच 'जराजर्जर' या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे, 'वार्धक्याने विकल झालेला!' यातील 'ज' चे उच्चार तालव्य (ज्य) आहेत. तर जरा (थोडे), जर (कलाबूत) या शब्दातील 'ज' चे उच्चार दन्तमूलीय आहेत. (दन्तमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी.) उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. 'सूतकताई' हा शब्द जर 'सूतक ताई' असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच 'अक्षरश:' हा शब्द लिहिताना 'अक्षर शहा' असे कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? |
2. रिकाम्या चौकटी भरा. (2)
अ) शब्द भलत्याच ठिकाणी तोडल्यामुळे होणाऱ्या गोंधळाचा शब्द - ______
आ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन - ______
3. स्वमत- (3)
'गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नये', या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) खालील कृती सोडवा. (2)
1)
दोन शब्दरूपे समान, उच्चार समान, अर्थ मात्र भिन्न असा शब्द. |
↓ |
2)
मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. |
↓ |
'पुराणातली वांगी पुराणात' या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल! तिथे मूळ म्हण होती 'पुराणातली वानगी पुराणात'. वानगी म्हणजे उदाहरणे. पण 'वानगी' झाली 'वांगी' आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी! अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात.
येथे पहिल्या वाक्यात 'कलेवर' हे शब्दरूप 'कला' या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात 'कलेवर' हे नाम असून त्याचा अर्थ 'शव' असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे.
अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे, तिचे अर्थसाैंदर्य कळल्यावरच आपण 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...' असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खर्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही. |
२) खालील आकृती पूर्ण करा. (2)
३) स्वमत - (3)
लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा.